Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

ब्यूटीफुल स्किन.....

आजचं युग हे प्रेझण्टेशनचे युग आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्री-पुरुष आपण सुंदर दिसावं, प्रेझेण्टेबल दिसावं याची काळजी घेऊ लागला आहे. पण, दिवसभराच्या
बिझी शेड्युलमुळे सर्वांनाच आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घेणं शक्य होत नाही. तसंच घरच्या घरी त्वचेची काळजी कशी घ्यायची हेही अनेकांना माहीत नसतं. यासाठीच कोणत्या प्रकारच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची, याच्या टिप्स दिल्या आहेत डॉ. निशा साने यांनी.

त्वचेचे चार प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :

तेलकट त्वचा : या त्वचेला हात लावलाच हाताला तेलकट स्पर्श होतो. कारण त्वचेतील स्द्गड्ढड्डष्द्गश्ाह्वह्य त्नड्डद्यठ्ठस्त्रह्य स्द्गड्ढह्वद्व नावाचं तैल दव्य अधिक प्रमाणात तयार करतं. त्यामुळे त्वचेवरील तेलाचं प्रमाण वाढतं. धूळ आणि सूर्याकिरणांचा परिणाम होऊन पिंपल्सचं प्रमाण वाढतं.

उपाय :

* त्वचेवर अधिक प्रमाणात असणारं तेलाचं प्रमाण कमी करण्यासाठी मुलतानी माती, गाईचं दूध आणि लिंबाच्या रसाचे दोन थेंब एकत्र करून त्याचा लेप आठवड्यातून एकदा लावा.

* चेहरा दिवसातून दोन-तीन वेळा थंड पाणी आणि लिंबाने धुवा.

* कोरफडीचा गर आणि मध एकत्र करून त्वचेला मसाज करावा. कोरफडीच्या गरामुळे पिंपल्स कमी व्हायला मदत होते.

* संत्र्याच्या सालीचं चूर्ण गाईच्या दुधात कालवून चेहऱ्यावर खालून वरच्या दिशेने लेप लावा.

कोरडी त्वचा : चेहरा साबणाने धुतल्यावर त्वचा खेचल्यासारखी सीबम कमी सिक्रिट झाल्यामुळे त्वचा कोरडी बनत असते. वेळीच दखल न घेतल्यास वयाआधीच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. त्वचा रुक्ष, निस्तेज, काळी पडते. रुक्ष त्वचेवर गायीचं तूप लावून आठवड्यातून दोन वेळा मसाज करा. यामुळे त्वचा तजेलदार बनण्यास मदत होते.

* पूर्ण पिकलेलं केळं, ग्लिसरीन आणि मध यांचा पॅक बनवून त्याने मसाज करावा.

* रोज रात्री एक बदाम भिजत घालून सकाळी तो उगाळून त्याचा लेप १५ मिनिटं चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेवरील मृतपेशी निघून जायला मदत होईल.

* मलई आणि चिमूटभर आंबेहळद एकत्र करून त्याने मसाज केल्यास त्वचेचा रंग उजळतो.

* मुलतानी माती, आंबेहळद आणि मलई एकत्र करून तो पॅक चेहऱ्यावर खालून वरच्या दिशेने लेप लावावा. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी व्हायला मदत होते.

मिश्र स्किन : या त्वचेला टी झोन स्किन असंही म्हणतात. कपाळ आणि नाक यावरील त्वचा तेलकट किंवा कोरडी असते. गाल आणि मानेवरील त्वचा कोरडी किंवा तेलकट असते. त्वचेच्या प्रकारानुसार चेहऱ्याला मसाज करावे लागतात.

संवेदनशील त्वचा : कुठल्याही नवीन घटकाचा संपर्क आल्यास त्वचेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे अशा त्वचेवर उपचार करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

नियमित ब्लीचिंग केल्यास हळूहळू त्वचा काळवंडते. त्याऐवजी घरच्या घरी ओली आंबेहळद, आणि लिंबुरस किंवा आंबेहळद आणि मुळ्याचा रस यांचा लेप लावू शकता. हे दोन्ही लेप १५ मिनिटांपेक्षा जास्त ठेवू नये.

त्याचबरोबर दररोज दोन ते अडीच लिटर पाणी प्यायला हवं. आहारात जास्तीतजास्त फळं आणि भाज्या घ्या.

कोणताही लेप लावण्यापूवीर् किंवा मसाज करण्यापूवीर् तो लेप आपल्या त्वचेला सूट होईल का, हे तपासून घ्या.

त्वचेच्या समस्या वेळीच लक्ष न दिल्यामुळे, निष्काळजीपणामुळे उद्भवतात. म्हणून वेळीच काळजी घेऊन त्वचा निरोगी राखा.
नकार